Show notes
ग्रीन कॉमेट नावानं ओळखला जाणारा धूमकेतू जगभरात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण तब्बल 50 हजार वर्षांनी तो पृथ्वीच्या जवळ आला आहे. म्हणजे याआधी हा धूमकेतू आला होता, तेव्हा इथे पृथ्वीवर निअँडरथल्स या आदिमानवाचा वावर होता आणि या धूमकेतूची एक फेरी पूर्ण होईपर्यंत आधुनिक मानवाची अख्खी प्रजाती विकसित झाली. हा धूमकेतू कसा, कुठे, कधी पाहता येईल आणि धूमकेतूंचा अभ्यास महत्त्वाचा का असतो? जाणून घेऊयात.
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

