सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवसेनेत पक्षप्रमुख कसा निवडला जातो?
6 minutes Posted Jan 12, 2023 at 4:03 pm.
0:00
6:22
Download MP3
Show notes

उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून मुदत येत्या 23 जानेवारीला संपत आहे. यासाठी पक्षांतर्गत प्रक्रिया पार पाडण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

10 जानेवारीला पार पडलेल्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाने लाखो कागदपत्रं पुरावे म्हणून सादर केली आहेत. तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेच्या घटनेत बेकायदेशीर बदल करण्यात आल्याचा दावा केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद घटनाबाह्य पद्धतीने तयार केलं असा शिंदे गटाचा आरोप आहे.