सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
BF.7 ओमिक्रॉन व्हेरिअंटपासून आपण घेतलेल्या लशी संरक्षण देतात का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
4 minutes Posted Dec 24, 2022 at 7:00 am.
0:00
4:54
Download MP3
Show notes

कोरोनाचे रुग्ण चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत वाढल्यानंतर भारतातही एका नवीन व्हेरिअंटचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सरकारने खबरदारीची पावलं टाकायला सुरुवात केलीय, प्रशासन सतर्क झालंय आणि पुन्हा मास्कची सक्ती होणार की काय, म्हणून तुमचीआमची काळजी वाढलीय.

पण अशात एक गोष्ट सगळेच विचारतायत, की मी काही महिन्यांपूर्वी ती कोव्हिडची लस घेतली होती, आणि तो बूस्टर डोसही घेतला होता. त्याचं काय?

या नवीन कोरोना व्हेरिअंटपासून मी सध्या किती सुरक्षित आहे? याच प्रश्नाचं उत्तर मिळवू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर