Show notes
मुंबईमध्ये गोवरच्या रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे. आतापर्यंत गोवरमुळे 3 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या मुंबईत गोवरचे निश्चित निदान झालेले 142 रुग्ण आहेत, शिवाय 1079 रुग्णांना ताप - पुरळ अशी लक्षणं आहेत, आणि ते गोवरचे संशयित म्हणून धरले जातायत.
मुंबईत गोवरच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्रीय आरोग्य पथकही दाखल झालंय. गोवर हा आजार नेमका काय आहे? गोवर रुग्णांची संख्या अचानक वाढतेय? त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यासाठी काय काळजी घ्यायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.... लेखन, संशोधन - टीम बीबीसी मराठीनिवेदन - गुलशनकुमार वनकरएडिटिंग - निलेश भोसले
