Show notes
दिल्लीमध्ये एका धर्मांतराच्या कार्यक्रमानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
त्यातल्या आपण हिंदू देवीदेवतांची पूजा करणार नाही, अशा आशयाच्या प्रतिज्ञेवरून भाजप आणि आम आम आदमी पक्षामध्ये राजकारण सुरू झालं. आपच्या मंत्र्याला राजीनामाही द्यायला लागला.नेमकं काय झालंय? आणि मुळात आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा काय सांगतात? निवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – अरविंद पारेकर
अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/india-63217207

