Show notes
*तिचे थांबणे ....* *असं म्हणतात, की वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही...पण वेळेचं गणित साधणाऱ्या 'ती' ला मात्र थांबावं लागतं वेगवेगळ्या रूपात ! --उदाहरणार्थ साध्या-साध्या गोष्टी--**पोळपाटावर एक पोळी लाटून तयार असते, इतकी जलद ..*.*पण 'ती' तिथे थांबून रहाते, तव्यावरची आधीची पोळी नीट भाजून होईपर्यंत. कंटाळा आला म्हणून अर्धी-कच्ची सोडत नाही...**कधी घामाघूम होऊन, कधी पाय, कधी पाठ दुखत असते... तरीही**सगळी कामे आटोपल्यावरही,ती ओट्यापाशी थांबते, गॅसवरचं दूध ओतून , वाया जाऊ नये म्हणून.**तशीच,**जोडीदार आकाशी उंच झेप घेत असताना, घरट्यातल्या पिलांच्या पंखात बळ येईपर्यंत , 'ती' थांबते.**शी-शु सांगता येणाऱ्या, पण आपले आपण आवरता न येणाऱ्या मुलांबाळांसाठी, कधी सोबतीला.... बाथरूमच्या दारापाशी ती थांबून असते.**मुलांकडून अभ्यास करून घेताना, शब्द- वाक्य- गणितं- व्याकरण सगळं बरोबर येईपर्यंत 'ती' थांबते.**मुलं लहान असो नाहींतर मोठी...परीक्षा, पालक-सभा, त्यांचं अभ्यासासाठी पहाटे लवकर उठणं, रात्री उशिरा झोपणं....सगळ्यासाठी ती त्यांच्या पाठीशी थांबते.**चहा-कॉफीचा एक निवांत घोट नवऱ्यासोबत घ्यायचा म्हणून थांबते**तेवढ्याच चार निवांत गप्पा होतील, एकमेकांचे त्रास-ताण , शेअर* *करण्यासाठी.**घरातल्या सगळ्यांना जेवण वाढून होईपर्यंत... कुणी उशिरा येणार असेल तर तोपर्यंत... 'ती' थांबते, जेवायची.**सगळ्यांच्या पाठीशी 'ती', थांबते.**खरंतर ती पाठीशी थांबते म्हणून सगळे चाललंय....व्यवस्थित.**काय हरकत आहे हे मान्य करायला...**तिच्या या, थांबण्यातही एक ऊर्जा आहे* ..*.त्या ऊर्जेमुळेच वेळ चांगली चालली आहे.**गेले जवळजवळ तेरा महिने महाकठीण प्रसंगाला सगळं जग तोंड देतंय,* *पण इथे वेळ भराभर निघून जातेय.**अशा वेळेस प्रत्येक घरात, ती मात्र पाठीशी 'थांबून' आहे ....अगदी स्ट्रॉंग...**एकही दिवस kitchen बंद नाहीये,**कंटाळा येतो, थकवा ही...तरीही**रोजच्या-रोज सगळी स्वछता,* *extra काळजी,**कोणत्याही आजारपणाला घरात शिरकाव करू द्यायचा नाही असं तिने मनाशी पक्क ठरवलंय.**म्हणूनच म्हंटल, तिच्या या, थांबण्यातही एक ऊर्जा आहे...त्या उर्जे मुळेच ही अशी कठीण वेळ ही निघून जाईल...!!!**प्रत्येक घरातील 'तिला' सादर नमन.*

