Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
Natakwala | Marathi Kavita | Stories | Information |
Mandar Kulkarni
मराठी कविता - कणा - कुसुमाग्रज
2 minutes Posted Dec 10, 2020 at 11:04 am.
0:00
2:25
Download MP3
Show notes

मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती

कविता - कणा
कवि - कुसुमाग्रज
अभिवाचक - मंदार कुलकर्णी

'ओळखलत का सर मला'--पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी।

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून:
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भींतीत नाचली
कळ्या हाती जाईल कशी-बायको मात्र वाचली—

भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे उरले—

कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे.चिखलगाळ काढतो आहे.'-

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
"पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला—

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा!