Show notes
वाचन किंवा वाद्य वाजवणे अशा एखाद्या गोष्टीचा समाजाला काय उपयोग, असे सहजतेने विचारले जाते. त्यावेळी आपण उपयुक्ततेची चाचपणी करत असतो. उपयुक्ततावाद किंवा सुखवाद याची मांडणी इंग्लंड येथील तत्त्वज्ञ जेरेमी बेंथम याने केली. त्याच्या विचाराचा आढावा या भागामध्ये घेणार आहोत.

