Show notes
भारताचं चंद्रयान-3 23 ऑगस्टला यशस्वीरीत्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरलं. आणि त्यातून आता प्रज्ञान रोव्हर बाहेरही आलं आहे, ज्याच्या मदतीने इस्रो पुढचं संशोधन सुरू करेल. पण हे सगळं संशोधन चंद्रावरच होईल, कारण चंद्राची माती आणि इतर खडक काही पृथ्वीवर परत आणणं सध्याच शक्य नाही.
पण तुम्हाला माहिती असेलच, यापूर्वीच्या अनेक चांद्र मोहिमांमध्ये रशिया, अमिरेका आणि चीनने चंद्रावरून बराच मालमसाला पृथ्वीवर संशोधनासाठी आला आहे.एक प्रश्न अनेक जण विचारत आहेत – चंद्रावरची माती कशी असते? त्यात काही पिकवणं शक्य आहे का? शोधू या याच प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – अरविंद पारेकर
