सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
2024 लोकसभेसाठी भाजप NDAमध्ये लहान प्रादेशिक पक्षांना का जोडतोय? | BBC News Marathi
5 minutes Posted Jul 19, 2023 at 3:54 pm.
0:00
5:22
Download MP3
Show notes

DES -

भाजपप्रणित National Democratic Alliance NDAने आधीच स्पष्ट केलं आहे की 2024च्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच लढणार. आणि त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष एकवटलेत. त्यांच्या आघाडीचं नाव INDIA अर्थात India National Developmental Inclusive Alliance असं जाहीर करण्यात आलंय.

23 जूनला बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या निमंत्रणावरून काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि PDPसह अनेक विरोधी पक्षांचे नेते पाटण्यात एकत्र आले होते. आणि आता दुसरी बैठक बंगळुरूत पार पडली.

पण विरोधकांही ही आघाडी मोदींना आव्हान देऊ शकेल, याविषयी अनेकांच्या मनात शंका आहे. पाहू यात अशा 4 गोष्टी ज्या या आघाडीच्या निर्मितीत अडथळे निर्माण करू शकतात...

वार्तांकन – कीर्ति दुबे, बीबीसी हिंदी

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर