Show notes
रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी. इथेच हिंदवी स्वराज्याची स्थापनी झाली, महाराजांचा राज्याभिषेक झाला. खरंतर 800 वर्षं जुन्या या किल्ल्याने त्याच्या आधी आणि त्याच्या नंतरही बरंच काही पाहिलंय. मग असा समृद्ध इतिहास असलेल्या हा किल्ला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान का नाही?
या यादीत कुणाला स्थान मिळतं? आणि त्याने खरंच काय बदलतं?समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
