
पुणे येथील सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक गुरू सावंत यांची खास प्रेरणादायी मुलाखत...ही मुलाखत युट्युबवर ही उपलब्ध
Jan 29, 2022
20 min

जळगाव येथील पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांची किशोर कुळकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. हा भाग आता युट्यूब वर देखील उपलब्ध...
Jan 22, 2022
17 min

मराठी माती डॉट कॉम चे सर्वेसर्वा हर्षद खंदारे यांची किशोर कुळकर्णी यांनी घेतलेली खास प्रेरणादायी मुलाखत...
Jan 8, 2022
16 min

💐💐 प्रथमतः ज्ञानभारती पॉडकास्टच्या सर्व श्रोत्यांना नूतन इंग्रजी वर्षाच्या 2022 च्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐 श्रोते हो, सामाजिक कार्यकर्त्या विनयाताई देसाई यांची आरती आपटे यांनी घेतलेली मुलाखत. वर्षारंभ एका चांगल्या मुलाखतीद्वारे होत आहे. आपल्या प्रतिक्रिया आमच्याकडे नक्की नोंदवा.
Jan 1, 2022
25 min

मराठीतले सुप्रसिद्ध नाट्य, सिने कलावंत, दिग्दर्शक मंदारजी पाठक यांची दिलखुलास मुलाखत..
Dec 25, 2021
49 min

धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते विलासराव पाटील सर यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल 'व्यक्तिविशेष' या सदरात ज्ञानभारती पॉडकास्ट च्या 31 व्या भागात माहिती. विलासराव हे माळी महासंघाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत. ते धुळे न पा शाळेमध्ये मुख्याध्यापक असून त्या माध्यमातून देखील त्यांचे शैक्षणिक कार्य सुरू आहे. त्यांचे मूळ गाव अमळनेर तालुक्यातील देवळी हे असून तेथे देखील त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाची शाळा सुरू केलेली आहे. निरपेक्ष भावनेने कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते विलासराव माळी पाटील यांचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण थेट विलासराव यांच्या दूरध्वनीवर अथवा माझ्या 94 22 77 67 59 येथे कळवाव्यात धन्यवाद
Dec 18, 2021
14 min

*आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार*
*पराग बोरसे यांच्याबद्दल थोडक्यात...*
सॉफ्ट पेस्टलच्या साहाय्याने कॅनव्हासवर व्यक्तीरेखा चितरणारे हरहुन्नरी कलाकार पराग बोरसे यांनी आपल्या वास्तववादी खास अशा शैलीने जगभरात ठसा उमटविला आहे...
अमेरिकास्थित पेस्टल सोसायटी ऑफ वेस्ट कोस्ट (कॅलिफोर्निया) ही संस्था व संपूर्ण अमेरिका जिचे कार्यक्षेत्र आहे अशी पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेने अत्यंत नावाजलेल्या न्यूयॉर्क येथील प्रदर्शनासाठी सलग तीनदा त्यांचा चित्राची निवड केली आहे. जगभरातील चित्रकार या प्रदर्शनासाठी चित्र पाठवितात त्यातून फक्त 99 चित्रांचीच निवड होते. अत्यंत प्रतिष्ठेचे असलेल्या या प्रदर्शनात बोरसे यांची निवड महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे...पेस्टल सोसायटी ऑफ वेस्ट कोस्ट यांचे 2018 व 2021 अशा दोन पुरस्काराने गौरवले आहे. अलीकडेच त्यांचा 'ब्राँझ पुरस्कार' ने गौरव झाला आहे.
Dec 11, 2021
23 min

योगशिक्षक कृणाल महाजन यांची किशोर कुळकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
Dec 4, 2021
14 min

#रिचरखा #अमितादेशपांडे यांची मुलाखत... (ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट..…भाग 28 वा) पुणे येथील 'रिचरखा' या संस्थेच्या संचालिका अमिता देशपांडे यांनी पर्यावरण जनजागृतीच्या दृष्टीने एक चळवळ सुरू केली आहे. प्लास्टिक रॅपर्स, कमी मायक्रोनच्या पॉलिथिलीन पिशव्या, बॅग जे पर्यावरणाला हानिकारक असते, त्या सगळ्या गोष्टी, गारबेज गोळा करून चरख्याच्या माध्यमातून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ काही नवीन तयार करण्याचे काम त्यांचा चमू करीत आहे. समाजाला पर्यावरणाची शिकवणूक देण्याचे काम ते करीत आहेत. गेल्या साडे सहा वर्षांपासून पुण्यात आणि दादरा-नगर-हवेलीला येथील आदिवासी-दुर्गम भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. विदेशामधील आयटी कंपनीतील सुखासुखी नोकरी सोडून त्या काही तरी वेगळे करण्यासाठी आल्या... त्यांनी भारतामध्ये येऊन रिचरख्याच्या माध्यमातून केलेल्या पर्यावरण जनजागृती संदर्भात मोठे काम उभारले आहे...जनसामान्यांमध्ये पर्यावरण जागरूकता तर केलीच व रोजगार देखील त्यांनी उपलब्ध केला. अत्यंत वेगळ्या वाटेची निवड करून त्यांनी आवळे कार्य मोठ्या निष्ठेने पुढे नेले. त्यांच्या कार्याला अधोरेखित करून 'संस्थाविशेष' या अंतर्गत ज्ञानभारती मराठी पॉडकास्टचा हा 28 वा भाग आम्ही देत आहोत. हा भाग आपल्याला कसा वाटला याबाबत अवश्य कळवावे... ( किशोर कुळकर्णी- 9422776759 )
Nov 27, 2021
22 min
Load more

