मराठीप्लस पॉडकास्ट
मराठीप्लस पॉडकास्ट
Marathi Plus
इंटरनेट अनेक शक्यतांनी भरलेलं आहे पण बहुतांश माहिती हि इंग्रजी भाषेत किंवा इतर भाषेत आहे. रंजक माहितीचा मोठा खजिना केवळ काही भाषांपुरता मर्यादित राहू नये. अधिकाधिक भाषांमध्ये त्याचा प्रसार व्हावा, माहितीचा, ज्ञानाचा उपयोग सर्वांना व्हावा आणि अमर्यादित शक्यतांचा शोध मराठी भाषा जाणणाऱ्या प्रत्येकाला घेता यावा यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आपल्या वाट्याचे कर्त्यव्य म्हणून मराठी प्लसच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.
हिचहायकर्स : अनेक वर्ष जग भ्रमण आणि प्रवास करायला निघालेले भटके
काहींना सन्यास घेऊन हिमालयात जाण्याची इच्छा असते किंवा काहींना पॅरिसमध्ये जाऊन आयफेल टॉवरसमोर थांबून सेल्फी काढण्याची इच्छा असते. तुम्हाला कधी घरदार सोडून निघून हिंडायला जावंस वाटतं का? नाही वाटतं असलं तरीही जबाबदाऱ्या आणि कोरोना महामारीमुळे मनासारखा मोठ्या कालावधीचा प्रवास घडेल अशी काही चिन्ह नाहीत पण काही लोकं आजही जगभर फिरत आहेत. हिचहायकिंग म्हणजे काय ह्या बद्दल आणि अनेक वर्ष जग भ्रमण आणि प्रवास करायला निघालेले भटक्यांविषयी माहिती घेऊ. --- Send in a voice message: https://anchor.fm/marathiplus/message
Oct 16, 2020
10 min