
#अक्षरभान- प्रमाणामध्ये : निकिता भागवत
प्रमाणामध्येमंडळी गेल्या आठवड्यात आपण 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला तेव्हा 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला. मराठी भाषेचा विचार करताना, दहा कोसांवर बदलत जाणारी मराठी हा अभिमानाचा विषय असला तरी सुद्धा; प्रमाण मराठी भाषेबद्दल वाढत असलेला अनादर ही एक चिंताजनक बाब भाषेच्या दृष्टीने आहे. मराठी भाषा बोलींची माध्यमातून वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये बहरतेच आहे, परंतु सगळ्यांची सर्वसमावेशक सर्वसामायिक अशी एक भाषा असणं राजकीय आणि कार्यालयीन दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याने प्रमाणभाषा असणं सर्व राज्यांना अनिवार्य झालं आहे. एकाच शब्दाला विविध बोलीभाषांमध्ये असलेले विविध प्रतिशब्द बघता प्रमाणभाषेची गरज अधिकच प्रमाणित होते आणि मग प्रमाण भाषेचं महत्त्व पटू लागत. विविध भाषा आणि त्यांच्या बोली भाषा हे आपल्या देशाचं वैभव आहे, त्यांची समृद्धी आहे पण त्यांचं महत्त्व मान्य करत असताना प्रमाण भाषेतले नियम प्रमाण भाषेतल्या तांत्रिक गोष्टी न मांडण्याचा अट्टाहास अलीकडे अनेक जण करताना दिसून येतात. हे मात्र होता कामा नये. प्रमाण मराठी भाषा ही या सगळ्यांच्या जडणघडणीचा परमोच्च बिंदू आहे असं मला नेहमी वाटतं. राज्याच्या भाषेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रमाण भाषेचं महत्त्व खूप जास्त अधोरेखित होतं. एकाच शब्दाला बोलीभाषांमध्ये असलेले विविध प्रतिशब्द मराठी शब्दाला दूर नेऊ शकतात. त्यामुळे ज्याला मराठी शिकायचे आहे त्याच्यासाठी प्रमाणभाषा अत्यंत गरजेची आहे. समजा मुलगा किंवा मुलगी हा शब्द आपण घेतला तर महाराष्ट्राच्या विविध बोलीभाषांमध्ये वेगवेगळे शब्द उदाहरणार्थ कोकणी- मालवणी भाषेत चेडवा गोव्याच्या कडच्या कोकणी भाषेत झील असा शब्द आहे. अहिराणी भाषेत मुलाला अंडोर तर मुलीला अंडेर असा शब्द आहे. आदिवासी भाषांमध्ये आणखीनच वेगळे शब्द आहेत. मग मराठी भाषा शिकत असताना काही तरी एक प्रमाण मानावंच लागेल. मुलगा आणि मुलगी हे प्रमाण भाषेतले शब्द आपल्याला मान्य करावेच लागतील. क्रियापदाच्या संबंधातही अनेक लोक असे प्रश्न उपस्थित करतात की, प्रमाण भाषाच काम आणायची बोलीभाषांमधले शब्दही मान्य केले गेले पाहिजे, आपण प्रमाणभाषेचा विचार केला तर मी बाहेरगावी चालले असा शब्दप्रयोग प्रमाणभाषेत केला जातो हेच वाक्य विदर्भाच्या परिसरात ' मी बाहेर चालली' असं म्हटलं जातं. अहिराणी असलेल्या प्रदेशांमध्ये हेच वाक्य मी बाहेर जाऊन राहिली अशा पद्धतीने बोलण्याची प्रथा आहे. असं समजू या की एखादा परदेशी नागरिक अथवा परराज्यात ला नागरिक आपली मराठी शिकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याने काय प्रमाण मानावं? 'जाऊन राहिली आहे',? 'चालली आहे ?प्रमाण भाषा अत्यंत गरजेची आहे. या गोष्टीला 'आक्षेप घेणाऱ्यांचं खरंच आश्चर्य वाटतं मला! कधीकधी एक कविताही यानिमित्ताने आठवते. 'प्रमाणामध्ये सर्वकाही असावे' तो संदर्भ वेगळा असला तरीसुद्धा प्रत्येक गोष्टीला प्रमाण ठरलेलं असतं आणि प्रमाणामध्ये सगळं काही असलं तर आयुष्य नीट चालतं. अन्नसाखळी बघितली तरीही आपल्याला हे निश्चितपणे लक्षात येतं. तिथला एक घटक मोठा झाला आणि एक अस्तित्वहीन झाला तर ती अन्नसाखळी नष्ट होते त्यामुळेच एकूणच त्या परिसंस्थेला धोका पोचायला वेळ लागत नाही. भाषेचंही तसंच आहे असं मला वाटतं. भाषेत सांगितलेले प्रमाण शब्द हे समजा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी बोली असलेल्या प्रदेशातल्या लोकांनी वापरले तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळेच प्रमाणभाषा ही कठीण वाटली, क्लिष्ट वाटली, फारच नियमबद्ध वाटली तरीही ती स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. भाषेत वाक्यरचना जशी महत्त्वाची असते तसाच विरामचिन्हांचा उपयोगही आत्यंतिक महत्त्वाचा असतो. चुकलं तर अर्थाचा अनर्थ काय होतो अनेक वेळेला आपल्याला अनुभवायला मिळतं. त्यावरून वेगवेगळे विनोदही हल्ली समाजमाध्यमांमध्ये आवडीने वाचले जातात. त्यामुळेच प्रमाण भाषेतल्या विरामचिन्हांचा ही उपयोग कसा आणि कुठे करायचा हे प्रत्येकाने शिकायला हवं. अशा गोष्टींना विरोध करून आपण काहीही साध्य करणार नाही. अत्यंत मूलभूत पातळीला असलेल्या, संस्कृतातून निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचं संगोपन करत करत, नवनवीन शब्दांचे आधार घेत आजची ही मराठी भाषा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. शास्त्रकारांनी नियम लावताना काहीतरी विचार निश्चितच केला असेल, नै?हे फार प्रकर्षाने आज इथे मांडण्याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा मला कार्यशाळेत आलेले अनुभव. लेखनाच्या राज्यभर कार्यशाळा घेत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जे बरे-वाईट अनुभव आले . त्यापैकीच अनुभव दोन-तीन ठिकाणी वेगळा विचार करायला भाग पाडून गेला. कोकणातल्या एका महाविद्यालयातले एक प्राध्यापक महाशय, जेव्हा कवितेच्या संदर्भात मार्गदर्शन करत असताना माझे सहकारी त्यांना नियम सांगू लागले आणि आपली महाकाव्य सुद्धा कशी
This podcast uses Anchor (from Spotify) for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.
